नुसतं लढ म्हणून जमतंय का?..

बाजारातून जाताना अचानक तो समोर आला. पांढरे पण कळकटलेले कपडे, तरुण पण रापलेला चेहरा, घट्टे पडलेले हात. समोर आला आणि लगेच माझा हात आनंदाने हातात घेत म्हणाला,
“ओळखलं का सर मला?”
मी नाही म्हणालो. तर म्हणाला.
“असुद्या सर. माझी ओळख ठेवावी असं काही नाही. मी तुमच्या यशोगाथेतला नाही. तुम्ही सक्सेस स्टोरी म्हणता ना त्याला. पण तुमचा विद्यार्थी आणि तुम्ही ते प्राध्यापक आहात ज्यांचा आजही मनात खोलवर प्रभाव आहे. तसेही तुम्ही यशस्वी विद्यार्थी लक्षात ठेवता आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांची नावं घेता. हा माझा विद्यार्थी म्हणून. पण अपयशी विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार सर? त्यांचं नाव कोण घेणार? मी ही असाच. गुमनाम. पण मी पांढरपेशा खिसेकापू नाही सर! अनेक विद्यार्थी खिसेकापूही होतात. त्यांना कोण म्हणणार हा माझा विद्यार्थी म्हणून?”
त्याची भाषा शुद्ध होती. शब्द धारदार आणि प्रश्न टोकदार होते.
“पण मला आजही तुम्ही वर्गात आहात आणि आम्ही ती तुम्ही शिकवत असलेली कविता तन्मय होऊन ऐकतोय असं जाणवतं. सर मी तिथेच राहिलो. हरवलेला. त्याच वर्गात.”
मी विचारलं, “कोणती कविता.” तर तो म्हणाला,
“ती मोचीराम. सुदाम पांडेय, धूमील यांची.”
आणि तो ती कविता चक्क तोंडपाठ बोलू लागला. त्याचा आवाज घोगरा होता पण शब्दांच्या जागा पकडून तो अरोह अवरोह बरोबर व्यक्त करत होता.
राँपी से उठी हुई आँखों ने मुझे
क्षण-भर टटोला
और फिर
जैसे पतियाये हुये स्वर में
वह हँसते हुये बोला-
बाबूजी सच कहूँ-मेरी निगाह में
न कोई छोटा है
न कोई बड़ा है
मेरे लिये, हर आदमी एक जोड़ी जूता है
जो मेरे सामने
मरम्मत के लिये खड़ा है।
और असल बात तो यह है
कि वह चाहे जो है
जैसा है, जहाँ कहीं है
आजकल
कोई आदमी जूते की नाप से
बाहर नहीं है
फिर भी मुझे ख्याल रहता है
कि पेशेवर हाथों और फटे जूतों के बीच
कहीं न कहीं एक आदमी है
जिस पर टाँके पड़ते हैं,
जो जूते से झाँकती हुई अँगुली की चोट छाती पर
हथौड़े की तरह सहता है।…..
त्याने कविता पूर्ण नाही केली. पण खात्री होती की त्याला पूर्ण पाठ निश्चित होती. तो पुन्हा बोलू लागला. आम्ही दोघेही भर बाजारात उभे होतो. पण मी त्याला बोलत राहू दिलं. तो ही बाजाराचं भान ठेवून दबक्या स्वरात बोलत होता. मी शुन्यमनाने त्याचा शब्द शब्द मनात उतरवत राहिलो...
“सर त्या कवितेतला नायक तुम्ही असा उभा केला होता, की आजही तो जसाच्या तसा दिसतो. मला आठवतं तो त्या छिद्र पडलेल्या बुटातून जगाकडे पाहतोय. माझीही अवस्था तशीच आहे सर छिद्र पडलेल्या बुटासारखी. मोचीराम ने बूट शिवताना घातलेला प्रत्येक टाका माझ्या काळजावर पडतो आजही. त्याची ती रापी आजही मनावर चालते. त्याचा तो बूट ठोकून नीट करतानाचा प्रत्येक घाव आजही माझ्या काळजावर पडतो सर. तरही मनाला रोज पॉलीश करुन बाहेर पडतो की सर्वकाही ठीक होईल. . . . . ”
आता त्याचे डोळे पानावले होते. माझा हात थोडा दाबत जड शब्दांत तो म्हणाला,
“सर, घाबरु नका. मी वेडा नाही झालेलो. पण का शिकलो आम्ही सर इतकं, ज्याचा पोटापाण्याशी काहीच सबंध नाही? का शिकवलंत तुम्ही इतकं चांगलं आम्हाला? सर मी तुमच्यामुळेच एम.ए. हिंदी केलं आणि सेट परीक्षाही पास झालो.”
त्याच्या या माहितीवर माझ्या चेहऱ्यावर उमटलेल्या आश्चर्य मिश्रीत प्रश्नचिन्हाला त्याने सपाट चेहऱ्याने लगेच उत्तर दिलं.
“सर आम्हाला कुठे गॉड फादर असतो का? आता सगळीकडे पैसा हाच परमेश्वर झालाय! तोच गॉड आणि तोच फादर. लाखावर रुपये संस्थेला द्यायाला असते तर हा असा खड्डे खोदायला कशाला गेलो असतो? हा आता एका साहेबाच्या घराची गटार तुंबलीये, ती साफ करायला निघालोय. सर आपल्या सिस्टीमचीच गटार होऊन तुंबलीये. सभ्यतेचा बुरखा घेतलेल्या व्यवस्थेचा चेहरा किती हिडीस आणि ओंगळ आहे हे कॉलेजलाईफ संपल्यावर समजलं. कोणत्याही शाळा महाविद्यालयात भ्रष्टाचार शिकवत नाहीत. पण शिकून मोठ्या पदावर गेलेले किती सफाईबाज पणाने 'हातसाफ' करतात ना. नशीबच लागतं ना त्याला पण. की शिक्षण लागतं.... सर कॉलेजच्या बाहेर बिनभिंतीचं कॉलेज सगळं विपरित आपोआप शिकवतं आणि कॉलेजमधलं सभ्य शिक्षण जगायला लागणारी बदमाशी मात्र शिकवायचं राहून जातं.”
मी निशब्द होतो. त्याची एकूणच अवस्था पाहून. दारिद्र्य तर जाणवतच होते पण त्या रापलेल्या अवस्थेतही त्याच्या सुकुमार वैचारिकप्रगल्भतेचं तेज म्हणावं की अगतिकाता, दिसत होती. मी ही कोणी धनदांडगा नव्हतो पण हात खिशाकडे गेला तसा तो खिशाकडे जाणारा हात पकडून म्हणाला...
“नाही सर पैसे नकोत मला. कष्ट करून घर चालतंय. मदत नको. वाईट कशाला वाटून घेता. खूप वर्षांनी तुम्हाला पाहून आणि भेटून खूप हायसं वाटलं. बोलून मन हलकं झालं. तुमच्यासारख्यांना पाहून नवी उमेद येते. आता नवं बळ मिळालं सर. आमचीही आठवण काढत जा. बस एवढंच.”
मी सुन्न होऊन त्याला पाहीलं - ऐकलं. हात जोडून थोडे खांदे उंचावून तो निघून गेला. मी उभा राहून त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे पहात राहिलो. त्याने मागे वळून पाहिलं नाही. पण एकदा डाव्या आणि एकदा उजव्या हाताने त्याने खाली मान घालून डोळे पुसले. ते मला स्पष्ट जाणवले. माझा कंठ दाटून आला होता आणि डोळ्यांच्या कडा ओल्या होत्या. मी साधासा शिक्षक. पण त्याचा विश्वास आणि ओढ किती मोठी होती. खजील होऊन माझा मलाच मी प्रश्न विचारला,
कोणती व्यवस्था अयशस्वी विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणार? कोण म्हणणार तो शेतमजूर माझा विद्यार्थी आहे? कोण सांगणार तो खड्डे खोदतोय ना तो माझा विद्यार्थी आहे? कोणी सांगेल का, काल बसस्टॅंडवर पकडलेला तो खिसेकापू तरुण माझा विद्यार्थी होता? ... आणि हो, तो परवा मोठ्ठी रक्कम घेताना लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात सापडला तो बडा अधिकारीही माझा विद्यार्थी होता.....
घरी गेल्यावर संध्याकाळी धूमिल यांची ती, ‘संसद से सडक तक’ या संग्रहातील कविता मी आवर्जून वाचायला घेतली, जी त्याला तोंडपाठ होती. कविता वाचताना मी ही माझ्या त्या औट घटकेच्या प्राध्यापक पदाच्या कालावधीत जाऊन आलो. जिथं मी पण अनेक तरुणांना सात्त्विक – सज्जन आणि निस्पृहतेचे धडे दिले होते. साहित्यातील संत, थोर आणि अलौकीक व्यक्ती समजावून सांगितल्या होत्या. त्या साहित्यातच राहिल्या पण जगण्याच्या स्पर्धेत ही विकृती कुठून आली असावी. सात्त्विकतेच्या संस्कारांत वाढलेल्यांना या बदमाश व्यवस्थेत आता नुसतं लढ म्हणून जमतंय का?..
प्रा. भरत भि. वेदपाठक,
एम.ए.,बी.एड्.,एम.एम.आर.,डि.सी.एम.,हिंदी पंडीत.
राँपी से उठी हुई आँखों ने मुझे
क्षण-भर टटोला
और फिर
जैसे पतियाये हुये स्वर में
वह हँसते हुये बोला-
बाबूजी सच कहूँ-मेरी निगाह में
न कोई छोटा है
न कोई बड़ा है
मेरे लिये,हर आदमी एक जोड़ी जूता है
जो मेरे सामने
मरम्मत के लिये खड़ा है।
और असल बात तो यह है
कि वह चाहे जो है
जैसा है,जहाँ कहीं है
आजकल
कोई आदमी जूते की नाप से
बाहर नहीं है
फिर भी मुझे ख्याल है रहता है
कि पेशेवर हाथों और फटे जूतों के बीच
कहीं न कहीं एक आदमी है
जिस पर टाँके पड़ते हैं,
जो जूते से झाँकती हुई अँगुली की चोट छाती पर
हथौड़े की तरह सहता है।
यहाँ तरह-तरह के जूते आते हैं
और आदमी की अलग-अलग ‘नवैयत’
बतलाते हैं
सबकी अपनी-अपनी शक्ल है
अपनी-अपनी शैली है
मसलन एक जूता है:
जूता क्या है-चकतियों की थैली है
इसे एक आदमी पहनता है
जिसे चेचक ने चुग लिया है
उस पर उम्मीद को तरह देती हुई हँसी है
जैसे ‘टेलीफ़ून ‘ के खम्भे पर
कोई पतंग फँसी है
और खड़खड़ा रही है।
‘बाबूजी! इस पर पैसा क्यों फूँकते हो?’
मैं कहना चाहता हूँ
मगर मेरी आवाज़ लड़खड़ा रही है
मैं महसूस करता हूँ-भीतर से
एक आवाज़ आती है-’कैसे आदमी हो
अपनी जाति पर थूकते हो।’
आप यकीन करें,उस समय
मैं चकतियों की जगह आँखें टाँकता हूँ
और पेशे में पड़े हुये आदमी को
बड़ी मुश्किल से निबाहता हूँ।
एक जूता और है जिससे पैर को
‘नाँघकर’ एक आदमी निकलता है
सैर को
न वह अक्लमन्द है
न वक्त का पाबन्द है
उसकी आँखों में लालच है
हाथों में घड़ी है
उसे जाना कहीं नहीं है
मगर चेहरे पर
बड़ी हड़बड़ी है
वह कोई बनिया है
या बिसाती है
मगर रोब ऐसा कि हिटलर का नाती है
‘इशे बाँद्धो,उशे काट्टो,हियाँ ठोक्को,वहाँ पीट्टो
घिस्सा दो,अइशा चमकाओ,जूत्ते को ऐना बनाओ
…ओफ्फ़! बड़ी गर्मी है’
रुमाल से हवा करता है,
मौसम के नाम पर बिसूरता है
सड़क पर ‘आतियों-जातियों’ को
बानर की तरह घूरता है
गरज़ यह कि घण्टे भर खटवाता है
मगर नामा देते वक्त
साफ ‘नट’ जाता है
शरीफों को लूटते हो’ वह गुर्राता है
और कुछ सिक्के फेंककर
आगे बढ़ जाता है
अचानक चिंहुककर सड़क से उछलता है
और पटरी पर चढ़ जाता है
चोट जब पेशे पर पड़ती है
तो कहीं-न-कहीं एक चोर कील
दबी रह जाती है
जो मौका पाकर उभरती है
और अँगुली में गड़ती है।
मगर इसका मतलब यह नहीं है
कि मुझे कोई ग़लतफ़हमी है
मुझे हर वक्त यह खयाल रहता है कि जूते
और पेशे के बीच
कहीं-न-कहीं एक अदद आदमी है
जिस पर टाँके पड़ते हैं
जो जूते से झाँकती हुई अँगुली की चोट
छाती पर
हथौड़े की तरह सहता है
और बाबूजी! असल बात तो यह है कि ज़िन्दा रहने के पीछे
अगर सही तर्क नहीं है
तो रामनामी बेंचकर या रण्डियों की
दलाली करके रोज़ी कमाने में
कोई फर्क नहीं है
और यही वह जगह है जहाँ हर आदमी
अपने पेशे से छूटकर
भीड़ का टमकता हुआ हिस्सा बन जाता है
सभी लोगों की तरह
भाष़ा उसे काटती है
मौसम सताता है
अब आप इस बसन्त को ही लो,
यह दिन को ताँत की तरह तानता है
पेड़ों पर लाल-लाल पत्तों के हजा़रों सुखतल्ले
धूप में, सीझने के लिये लटकाता है
सच कहता हूँ-उस समय
राँपी की मूठ को हाथ में सँभालना
मुश्किल हो जाता है
आँख कहीं जाती है
हाथ कहीं जाता है
मन किसी झुँझलाये हुये बच्चे-सा
काम पर आने से बार-बार इन्कार करता है
लगता है कि चमड़े की शराफ़त के पीछे
कोई जंगल है जो आदमी पर
पेड़ से वार करता है
और यह चौकने की नहीं,सोचने की बात है
मगर जो जिन्दगी को किताब से नापता है
जो असलियत और अनुभव के बीच
खून के किसी कमजा़त मौके पर कायर है
वह बड़ी आसानी से कह सकता है
कि यार! तू मोची नहीं ,शायर है
असल में वह एक दिलचस्प ग़लतफ़हमी का
शिकार है
जो वह सोचता कि पेशा एक जाति है
और भाषा पर
आदमी का नहीं,किसी जाति का अधिकार है
जबकि असलियत है यह है कि आग
सबको जलाती है सच्चाई
सबसे होकर गुज़रती है
कुछ हैं जिन्हें शब्द मिल चुके हैं
कुछ हैं जो अक्षरों के आगे अन्धे हैं
वे हर अन्याय को चुपचाप सहते हैं
और पेट की आग से डरते हैं
जबकि मैं जानता हूँ कि ‘इन्कार से भरी हुई एक चीख़’
और ‘एक समझदार चुप’
दोनों का मतलब एक है-
भविष्य गढ़ने में ,’चुप’ और ‘चीख’
अपनी-अपनी जगह एक ही किस्म से
अपना-अपना फ़र्ज अदा करते हैं
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा