पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका खुषीची दुसरी गोष्ट

इमेज
                                                                                        एका खुषीची दुसरी गोष्ट ( ही एका अशा पराभवाची कथा आहे ज्यात या चिमुरडीची कथा नव्हे व्यथा आहे.   तिचे नाव खुषी.   पण तिच्या वाट्याला खुषी आलीच नाही.   पराभव खुषीचा झाला की व्यवस्थेचा? )   तांदणं.... तांदणं झाली रात..... तांदणं.... तांदणं झाली रात...... बोबड्या बोलण्यानं तिच्या या ओळी आणखीनच मधूर वाटत.   रोज संध्याकाळी ती या ओळी गुणगुणायची.   इटुकलीशी ती, या महागड्या हॉस्पीटलच्या प्रशस्त , चकाचक पण खचाखच भरलेल्या जनरल वॉर्डमध्ये साधारणपणे आठ दिवसांपासूनच होती.             तशी साधारण वाटणारी ती तिच्या बेडवर कधी नसायचीच. जनरल वॉर्डमधले सगळे बेड तिचेच.   कधी या मावशीच्या बेडवर ...