पोस्ट्स

ब्रह्म ते ब्रह्मांड -

इमेज
एका शब्दाच्या ध्वन्य-प्रकटीकरणातून विश्वाच्या आरंभाकडे पाहण्याचा नवा प्रश्न मराठी अभिजात भाषा गौरव दिन साजरा करताना आपण मराठीच्या इतिहासाचा , तिच्या साहित्याचा आणि तिच्या समृद्ध शब्दभांडाराचा गौरव करतो. पण एखाद्या भाषेची अभिजातता केवळ तिच्या प्राचीन परंपरेत असते का ? की त्या भाषेतील शब्द आजही आपल्याला नवीन प्रश्न विचारायला प्रवृत्त करू शकतात ? असाच एक प्रश्न माझ्या मनात बराच काळ घोळत आहे. तो शब्द आहे— “ ब्रह्म”. या शब्दाकडे धार्मिक किंवा तात्त्विक अर्थाने पाहण्याची मोठी परंपरा आहे. परंतु क्षणभर त्याचा अर्थ बाजूला ठेवून केवळ त्याच्या उच्चाराकडे पाहिले तर ? कागदावर लिहिलेले “ब्रह्म” आणि मुखातून उच्चारलेले “ब्रह्म” या दोन्ही गोष्टी खरोखर एकच आहेत का ? नाही. आणि कदाचित आपल्या प्रश्नाची सुरुवात नेमकी इथून होते. शब्द म्हणजे अक्षर की घटना ? कागदावर लिहिलेला शब्द ही एक दृश्य आकृती आहे. आपण त्या आकृतीतील अक्षरे ओळखतो आणि त्यातून अर्थ प्राप्त करतो. परंतु कागदावर लिहिलेल्या “ब्रह्म”मध्ये आवाज नाही. त्यात हवेचा दाब नाही. कंपन नाही. अनुनाद नाही. तो शब्द मनुष्य उच्चारतो...

‘फिलगुड’करींचा आणखी एक प्याला

इमेज
‘ फिलगुड ’ करींचा आणखी एक प्याला ( हे स्वप्नातील एक स्वगत कथन आहे.   याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.) (विद्यामंदिरांवर ताले आणि मदिरालये खुलेआम चाले.   शाला बंद ठेवणे ही मजबुरी आहे पण मधुशाला सुरु ठेवणे हे अवघड दुखणं आहे.   रांगा दोनच ठिकाणी आहेत, पहिले ठिकाण रुग्णालये आणि दुसरे ठिकाण मदिरालये.   पण दवा गायब आणि दारू मुबलक असलेल्या या व्यवस्थेत दवा दामदुप्पटतेने मिळविण्यासाठी याचना आणि वणवण करावी लागतेय आणि दारू मात्र घरपोच सुद्धा होतेय.) सत्तेशी सत्याचे सतत युद्ध चालू असते.   पण व्यक्ती सत्याची बाजू घेऊ शकत नाही, ही कमजोरी माझ्यातही आहे.   पण इथे सर्वजण मिट्ट अंधाऱ्या भुयारातून गुपचुपपणे चालत आहेत.   असे वाटते या चालणाऱ्या प्रत्येकाच्या अंतरंगात एक आग धगधगत आहे.   मात्र ते तिला आतल्या-आतच दाबून ठेवत आहेत आणि त्याची वेदना प्रत्येकाच्या डोळ्यात साकळलेली दिसते आहे.           माझा हा अनुभव खूपच विचित्र आहे.   मी माणसांच्या या गर्दीला चिरून जेवढा मुसंडी मारत पुढे जातो, तेवढाच स्वतःला मागे आणि...

मऱ्या

इमेज
  देवानेच डॉक्टरांच्या हातांना स्पर्श करुन पृथ्वीवर पाठवलेलं असतं.  रुग्णांच्या वेदना थांबवण्यासाठी.  परमेश्वर स्वतः येत नाही पण त्याच्या हाताच्या स्पर्शाने डॉक्टरांना पाठवतो.   त्याचं नाव तसं रमाकांत होतं.  या नावाचं इतरांना मोठं कौतूक वाटायचं.  तो तसं आवर्जुन सांगायचा, “ माझं नाव रमाकांत हाई. ”   हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर सवर्णी उमंग दिसायचा.  पण वस्त्यांवर त्याच्या नावाचा भलताच अपभ्रंष झाला होता.  जसं, आधी रमाकांतचा रम्या झाला आणि नंतर मऱ्या.  आता त्याला सगळे मऱ्या म्हणूनच ओळखतात.  खरं तर आता त्याला रमाकांत म्हणून हाक मारली तर तो ‘ ओ ’ पण द्यायाला विसरलाय.  पण मऱ्या म्हटलं की धडपडत “ जी. ” म्हणत समोर उभं राहायचा.  त्याच्या त्या भलत्याच लगबगीत अदब आणि दीनवाणा भेकडपणाही असायचा.  “ इतका का रे आदबीनं उभा राहतोस. ” म्हणून त्याला विचारलं तर म्हणायचा, “ कायये ना भाऊ. वाटतं उगीच कुणी आपल्यावर नाराज व्हया नगं.  कशाला कुणाचं बालंट.  व्हय.  तसं मला पोलिसांचा कमी आणि आमच्याच माणसांचा ज्यादा तरास असतो...

नुसतं लढ म्हणून जमतंय का?..

इमेज
     (ही व्यथा एक काल्पनिक सत्य आहे.)      बाजारातून जाताना अचानक तो समोर आला.  पांढरे पण कळकटलेले कपडे , तरुण पण रापलेला चेहरा , घट्टे पडलेले हात. समोर आला आणि लगेच माझा हात आनंदाने हातात घेत म्हणाला , “ ओळखलं का सर मला ?”   मी नाही म्हणालो. तर   म्हणाला.      “ असुद्या सर. माझी ओळख ठेवावी असं काही नाही. मी तुमच्या यशोगाथेतला नाही.   तुम्ही सक्सेस स्टोरी म्हणता ना त्याला.   पण तुमचा विद्यार्थी आणि तुम्ही ते प्राध्यापक आहात ज्यांचा आजही मनात खोलवर प्रभाव आहे.   तसेही तुम्ही यशस्वी विद्यार्थी लक्षात ठेवता आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांची नावं घेता.   हा माझा विद्यार्थी म्हणून.   पण अपयशी विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार सर ?   त्यांचं नाव कोण घेणार ?   मी ही असाच.   गुमनाम.   पण मी पांढरपेशा खिसेकापू नाही सर !   अनेक विद्यार्थी खिसेकापूही होतात.   त्यांना कोण म्हणणार हा माझा विद्यार्थी म्हणून ?”   त्याची भाषा शुद्ध होती. शब्द धारदार आणि प्रश्न टोकदार...

ऊस व राजकारणाच्या फडातील कोंबडीबाज बिबटे

इमेज
     हे एक रुपक असले तरी याचे वास्तव मात्र खूप जळजळीत आहे.  नजिकच्या भविष्यकाळात यावर व संभाव्य धोक्यांवर उपाय होईल अशी चिन्हे नाहीत.  परिणामी आजचे जंगल आणि राजकारण रिकामे ते रिकामेच राहील.  पोकळ आशावाद अगतिक व भोळ्या समाजाला बळीचा बकरा बनवत राहील. गावोगावी राजकारण आणि उसाच्या फडात कोंबडीबाज बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  उसाच्या फडातील बिबट पोटासाठी आणि राजकारणाच्या फडातील ‘ बिबट ’ नोटांसाठी आटापिटा करत आहेत.  नोटांची गरज सगळ्यांना असते, कारण नोटांचा प्रश्न हा पोटाच्या प्रश्नाशी निगडीत आहे. पण सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांची अवस्था जशी, ‘ घर का ना घाट का ’ होते तशी बिबट्यांची अवस्था, ‘ न जंगल का न जमीन ’ का अशी झाली आहे. दोन्हीकडील स्थिती हादरे देणारी आहे.  तुटलेल्या जंगलाने बिबट्यांचा लुटलेला संसार त्यांनी उसाच्या फडात थाटला.  तिथेच पिलांना जन्म दिला आणि पोटासाठी शेती लगतच्या वस्त्यांवरती हल्ला केला, अशी ही इतकी सहज सोपी कथा नाही.  जंगल तुटीने घर हरवलेल्या बिबट परिवाराची व्यथा आणि बिबट्यामुळे आपलं माणूस गमावून उध्...