पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नुसतं लढ म्हणून जमतंय का?..

इमेज
  (ही व्यथा एक काल्पनिक सत्य आहे. स्वतः जगलेलं.) बाजारातून जाताना अचानक तो समोर आला.   पांढरे पण कळकटलेले कपडे , तरुण पण रापलेला चेहरा , घट्टे पडलेले हात. समोर आला आणि लगेच माझा हात आनंदाने हातात घेत म्हणाला , “ ओळखलं का सर मला ?”   मी नाही म्हणालो. तर   म्हणाला. “ असुद्या सर. माझी ओळख ठेवावी असं काही नाही. मी तुमच्या यशोगाथेतला नाही.   तुम्ही सक्सेस स्टोरी म्हणता ना त्याला.   पण तुमचा विद्यार्थी आणि तुम्ही ते प्राध्यापक आहात ज्यांचा आजही मनात खोलवर प्रभाव आहे.   तसेही तुम्ही यशस्वी विद्यार्थी लक्षात ठेवता आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांची नावं घेता.   हा माझा विद्यार्थी म्हणून.   पण अपयशी विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार सर ?   त्यांचं नाव कोण घेणार ?   मी ही असाच.   गुमनाम.   पण मी पांढरपेशा खिसेकापू नाही सर !   अनेक विद्यार्थी खिसेकापूही होतात.   त्यांना कोण म्हणणार हा माझा विद्यार्थी म्हणून ?”   त्याची भाषा शुद्ध होती. शब्द धारदार आणि प्रश्न टोकदार होते.   “ पण मला आजही तुम्ही...