पोस्ट्स

अधीन व्हावे की ठेवावे

इमेज
       यथार्थ आणि आदर्श यांमधे जमीन आणि आसमान इतके अंतर असते.    आदर्शाच्या शोधाचे बेगडीपण पांघरुण यथार्थाच्या अस्तित्त्वाकडे डोळेझाक करणे ही व्यापक समाजाची सवय असते.    राजकारण्यांना लोकांच्या नासमज असण्याच्या तुलनेत समजुतदार असण्याची भिती जास्त असते.    कारण समजदार लोकं , राजकारणी काय बोलतात याबरोबरच ते का बोलतात याचा विचार करतात.    त्यांना परिणामांची जाणवी होते.    अशा वेळी समजदारांकडून राजकारण्यांचे हेतू साध्य होत नाहीत.    परंतु समजदार एक तर राजकारण्यांच्या हेतुपुरस्सर बोलण्याकडे दुर्लक्ष करतात किंवा मौन राहतात.    जे समजासाठी घतक ठरतं किंवा राजकारण्यांच्या हेतुविषयी असं काही बोलतात जे की राजरकारण्यांसाठी घतक ठरतं.   व्यक्त होणाऱ्या समजदारांवर , ‘ नकारात्मक विचारांचे लोकं ’  असा ठसा उमटवण्याचे गोबेल नीतीचे प्रकार होतात.    यासाठी नासमज लोकांचा पुरेपूर वापर करून खरं सांगणारांना वाळीत , वेगळं , नको असलेले असं काहीसं ठरविण्याचे प्रयत्न होतात.    पण वेगळं काही...

‘फिलगुड’करींचा आणखी एक प्याला

इमेज
‘ फिलगुड ’ करींचा आणखी एक प्याला ( हे स्वप्नातील एक स्वगत कथन आहे.   याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.) (विद्यामंदिरांवर ताले आणि मदिरालये खुलेआम चाले.   शाला बंद ठेवणे ही मजबुरी आहे पण मधुशाला सुरु ठेवणे हे अवघड दुखणं आहे.   रांगा दोनच ठिकाणी आहेत, पहिले ठिकाण रुग्णालये आणि दुसरे ठिकाण मदिरालये.   पण दवा गायब आणि दारू मुबलक असलेल्या या व्यवस्थेत दवा दामदुप्पटतेने मिळविण्यासाठी याचना आणि वणवण करावी लागतेय आणि दारू मात्र घरपोच सुद्धा होतेय.) सत्तेशी सत्याचे सतत युद्ध चालू असते.   पण व्यक्ती सत्याची बाजू घेऊ शकत नाही, ही कमजोरी माझ्यातही आहे.   पण इथे सर्वजण मिट्ट अंधाऱ्या भुयारातून गुपचुपपणे चालत आहेत.   असे वाटते या चालणाऱ्या प्रत्येकाच्या अंतरंगात एक आग धगधगत आहे.   मात्र ते तिला आतल्या-आतच दाबून ठेवत आहेत आणि त्याची वेदना प्रत्येकाच्या डोळ्यात साकळलेली दिसते आहे.           माझा हा अनुभव खूपच विचित्र आहे.   मी माणसांच्या या गर्दीला चिरून जेवढा मुसंडी मारत पुढे जातो, तेवढाच स्वतःला मागे आणि...

एका खुषीची दुसरी गोष्ट

इमेज
                                                                                        एका खुषीची दुसरी गोष्ट ( ही एका अशा पराभवाची कथा आहे ज्यात या चिमुरडीची कथा नव्हे व्यथा आहे.   तिचे नाव खुषी.   पण तिच्या वाट्याला खुषी आलीच नाही.   पराभव खुषीचा झाला की व्यवस्थेचा? )   तांदणं.... तांदणं झाली रात..... तांदणं.... तांदणं झाली रात...... बोबड्या बोलण्यानं तिच्या या ओळी आणखीनच मधूर वाटत.   रोज संध्याकाळी ती या ओळी गुणगुणायची.   इटुकलीशी ती, या महागड्या हॉस्पीटलच्या प्रशस्त , चकाचक पण खचाखच भरलेल्या जनरल वॉर्डमध्ये साधारणपणे आठ दिवसांपासूनच होती.             तशी साधारण वाटणारी ती तिच्या बेडवर कधी नसायचीच. जनरल वॉर्डमधले सगळे बेड तिचेच.   कधी या मावशीच्या बेडवर ...