डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकसंख्या विषयक विचार.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुमुखी व्यक्तिमत्वात त्यांचे अर्थशास्त्र व लोकसंख्या विषयक विचार त्यांचा दृष्टेपणा दर्शविणारे आहेत. बाबासाहेबांनी तत्कालीन स्थितीमधे कुटुंब नियोजनाचे महत्त्व स्पष्ट केले होते. या अत्यंत महत्त्वाच्या व दूरगामी परिणाम करणाऱ्या मुद्द्यंवर त्यांनी अभ्यासपूर्ण व सकारात्मक प्रयत्न केले होते. लोकसंख्या वाढ ही समस्या कायम आहे. आता या समस्येच्या स्वरुपात काळानुरुप बदल झाला आहे. काही देश व समाज यांच्या दृष्टीने लोकसंख्या वाढ उपयुक्त बाब आहे किंवा वर्चस्ववादासाठीचे शस्त्र बनले आहे. मात्र जगण्याचे शास्त्र यामुळे बाधीत होत असेल तर या संकल्पना लोकोपयोगी होऊच शकत नाहीत. दलितांचे नेते, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, स्त्रियांचे कैवारी, अर्थशास्त्री, समाजशास्त्री, कृषीधोरणाचे चिंतक, अशा विविध पैलुंचे एकत्र स्वरुप म्हणजे बाबासाहेब होत. देशाला जलसाक्षरता आणि उर्जा साक्षरतेची गरज आहे असे त्यांनी १९४२ सालीच सांगीतले होते. देशाची अफाट वाढणारी लोकसं...