पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझी लीव्ह व्हॅकन्सी..

इमेज
                                                    प्रवास सुखाचा झाला.   २६ जानेवारीलाच लीव्ह व्हॅकंन्सीवर हजर होण्याचा उत्साह.   माणसं कशी असतील याचं दडपण.   मात्र मुख्याध्यापक जाध व सरांनी हसतमुखाने स्वागत केलं आणि दडपण गेलं.   इथे अधिकाधिक श्रवणभक्ती करण्याचा सल्ला अनुभवींनी दिला होता.   सुरुवातीला कार्यालयातच ओळखपरेड झाली.   मुख्याध्यापकांच्या सांगण्यानुसार अंघोळीसाठी शिपायानं पाणी गरम करायला ठेवलं.   प्रयोगशाळेतील बाथरुम मधे कडक पाणी अंगावर घेतलं.   खूप बरं वाटलं.   मुख्याध्यापकांनी गोड सरांशी परिचय करुन दिला.   गोडसर नावासारखेच गोड मृदुभाषी सौम्य व्यवक्तीमत्व.   मातृहृदयीच म्हणाना.   यांच्यावर माझी पुढील व्यवस्था सोपवली.   त्यांनी डबा आणलाय का विचारलं आणि संध्याकाळी जेवणाला येण्याचं आमंत्रण दिलं.   “ खोली पाहून हाताने करुन खा, तो पर्यंत साठक सर डबा देतील .”...