पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आकर्षण

इमेज
                 नुकतेच नव्या गावात नव्या खोलीवर आलो होतो.   पहिल्याच दिवशीच्या रात्री विलक्षण स्वप्नाने भुरळ पाडली आणि विलक्षण आंतरिक ओढीने कासावीस झालो.   अनेक स्वप्ने पाहिली, परंतु या स्वप्नाने वेगळीच चुटपूट लागली.   स्वप्नात पाहिलेल्या विलोभनिय, सुंदर व नाजूक आकृतीने मोहिनी घातली.   स्वप्नात आलेली ती अपेक्षा नसताना वेडावून गेली.   माझ्या खोली समोरच्या मोठ्या पटांगणातील पायांना सरावलेल्या वाटेवरुन तिच्या आकर्षक लयीन ती चालत गेली, मानवेळावत.   त्या चालीने तिचे उडणारे बॉबकट केस जणू खुणावतायंत, निसर्गाने, सवडीने आणि सर्व सौंदर्याने बनविलेली, वेली सारखी नाजूक असलेली ही काया तुझ्याच साठीच आहे.             ती गेली तशीच आली आणि आमची नजरा-नजर झाली.   तशी ती कावरी-बावरी झाली.   क्षणभर दोघांच्या नजरा स्थिरावल्या, अगदी क्षणभरच.   काजवा चमकून जावा तशा.   शहारल्या अंगाने लाजून तिने लाजाळूच्या पानाला स्पर्श केल्या प्रमाणे पापण्यां खाली घेतल...

क्रम नसलेला कार्यक्रम

इमेज
  भोपू सर म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापकापेक्षाही बडं प्रस्थ.   सदऱ्यापेक्षा बनीयन मोठा, चहा पेक्षा किटली गरम असं म्हणतातना   तसंच.   भोपू सरांचं राहणं जुण्या पद्धतीच्या टिपीकल मास्तरासारखं आणि बोलणं नव्या पद्धतीच्या टारगट पुढाऱ्यासारखं.   असा हा अजब समन्वय या व्यक्तीमत्त्वात होता.          गुणोरीच्या ग्रामसचिवालयाचं बांधकाम वेगाने पूर्ण करुन घेतलं गेलं होतं.   जवळच एका कृषी मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री येणार होते.   त्याच तारखेचा मेळ साधायचा होता म्हणून धावपळ चालली होती.   ते आमच्या शाळेलाही भेट देणार अशी कुणीतरी आवई उठवली होती.   त्यांच्या स्वागताची तयारी करण्याच्या सूचनांसाठी सुपरवायझर भोपू सरांनी आख्खा एक मूल्य शिक्षणाचा तास घातला.   घोळून घोळून त्याच त्या सूचना माईक समोर उभे राहून विद्यार्थ्यांना ऐकवल्या.   स्वागत पद्यावरही मोठी लांबडी व बेचव सभाच त्यांनी झोडली.   माईकमधून बोलण्यामागे एक हेतु असतो, आवाज गावाला ऐकू जातो.   मग गाव त्यांच्या धडपडीची दखल घेतं अशी त्यांची समजूत होती. ...