पोस्ट्स

आकर्षण

इमेज
                 नुकतेच नव्या गावात नव्या खोलीवर आलो होतो.   पहिल्याच दिवशीच्या रात्री विलक्षण स्वप्नाने भुरळ पाडली आणि विलक्षण आंतरिक ओढीने कासावीस झालो.   अनेक स्वप्ने पाहिली, परंतु या स्वप्नाने वेगळीच चुटपूट लागली.   स्वप्नात पाहिलेल्या विलोभनिय, सुंदर व नाजूक आकृतीने मोहिनी घातली.   स्वप्नात आलेली ती अपेक्षा नसताना वेडावून गेली.   माझ्या खोली समोरच्या मोठ्या पटांगणातील पायांना सरावलेल्या वाटेवरुन तिच्या आकर्षक लयीन ती चालत गेली, मानवेळावत.   त्या चालीने तिचे उडणारे बॉबकट केस जणू खुणावतायंत, निसर्गाने, सवडीने आणि सर्व सौंदर्याने बनविलेली, वेली सारखी नाजूक असलेली ही काया तुझ्याच साठीच आहे.             ती गेली तशीच आली आणि आमची नजरा-नजर झाली.   तशी ती कावरी-बावरी झाली.   क्षणभर दोघांच्या नजरा स्थिरावल्या, अगदी क्षणभरच.   काजवा चमकून जावा तशा.   शहारल्या अंगाने लाजून तिने लाजाळूच्या पानाला स्पर्श केल्या प्रमाणे पापण्यां खाली घेतल्या आणि ओळखीच्याच वाटेवर नवख्यागत निघून गेली.             एवढंच स्वप्न पाहिलं आणि मनाची वेडी धाव त्या स्वप्नातील तिला आठवू लागली.   मग रोज तोच अनुभव.   इथपर्

क्रम नसलेला कार्यक्रम

इमेज
  भोपू सर म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापकापेक्षाही बडं प्रस्थ.   सदऱ्यापेक्षा बनीयन मोठा, चहा पेक्षा किटली गरम असं म्हणतातना   तसंच.   भोपू सरांचं राहणं जुण्या पद्धतीच्या टिपीकल मास्तरासारखं आणि बोलणं नव्या पद्धतीच्या टारगट पुढाऱ्यासारखं.   असा हा अजब समन्वय या व्यक्तीमत्त्वात होता.          गुणोरीच्या ग्रामसचिवालयाचं बांधकाम वेगाने पूर्ण करुन घेतलं गेलं होतं.   जवळच एका कृषी मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री येणार होते.   त्याच तारखेचा मेळ साधायचा होता म्हणून धावपळ चालली होती.   ते आमच्या शाळेलाही भेट देणार अशी कुणीतरी आवई उठवली होती.   त्यांच्या स्वागताची तयारी करण्याच्या सूचनांसाठी सुपरवायझर भोपू सरांनी आख्खा एक मूल्य शिक्षणाचा तास घातला.   घोळून घोळून त्याच त्या सूचना माईक समोर उभे राहून विद्यार्थ्यांना ऐकवल्या.   स्वागत पद्यावरही मोठी लांबडी व बेचव सभाच त्यांनी झोडली.   माईकमधून बोलण्यामागे एक हेतु असतो, आवाज गावाला ऐकू जातो.   मग गाव त्यांच्या धडपडीची दखल घेतं अशी त्यांची समजूत होती.               २४ फेब्रुवारीला त्यांनी स्वागत पद्याची रंगीत तालीम पाहिली.   एकदम भडकलेच.   “ पद्य बकवास

अधीन व्हावे की ठेवावे

इमेज
       यथार्थ आणि आदर्श यांमधे जमीन आणि आसमान इतके अंतर असते.    आदर्शाच्या शोधाचे बेगडीपण पांघरुण यथार्थाच्या अस्तित्त्वाकडे डोळेझाक करणे ही व्यापक समाजाची सवय असते.    राजकारण्यांना लोकांच्या नासमज असण्याच्या तुलनेत समजुतदार असण्याची भिती जास्त असते.    कारण समजदार लोकं , राजकारणी काय बोलतात याबरोबरच ते का बोलतात याचा विचार करतात.    त्यांना परिणामांची जाणवी होते.    अशा वेळी समजदारांकडून राजकारण्यांचे हेतू साध्य होत नाहीत.    परंतु समजदार एक तर राजकारण्यांच्या हेतुपुरस्सर बोलण्याकडे दुर्लक्ष करतात किंवा मौन राहतात.    जे समजासाठी घतक ठरतं किंवा राजकारण्यांच्या हेतुविषयी असं काही बोलतात जे की राजरकारण्यांसाठी घतक ठरतं.   व्यक्त होणाऱ्या समजदारांवर , ‘ नकारात्मक विचारांचे लोकं ’  असा ठसा उमटवण्याचे गोबेल नीतीचे प्रकार होतात.    यासाठी नासमज लोकांचा पुरेपूर वापर करून खरं सांगणारांना वाळीत , वेगळं , नको असलेले असं काहीसं ठरविण्याचे प्रयत्न होतात.    पण वेगळं काही करण्यासाठी थोडासा तरी धोका पत्करावा लागतो.    जर सुरक्षीत वातावरणातच राहून आपली प्रगती होईल असं वाटत असेल तर ते चुकीचं ठरतं