श्रीकृष्ण समजून घेताना
हींसा आणि अहिंसा यांना आपापल्या मर्यादा असतात. जिथे अहींसेची मर्यादा संपते तिथे हिंसा अनिवार्य होते. परंतु अशा स्थितीत अहींसेची जपमाळ ओढत बसणारांवर हींसकांच्या शस्त्राला बळी पडून आपले अस्तित्व आपल्या कथित अहिंसात्मक वैचारिक षंढतेने संपवून टाकण्याची बिकट स्थिती ओढावते. युद्ध टाळण्याचे सर्व कूटनैतिक मार्गव अटोकाट प्रयत्न संपल्यावर युद्धाची मानसीकताच न बाळगणारे संपून जातील हे निश्चित. युद्ध अंतीम पर्याय असला तरी त्याची तयारीच न करणारे भेकड आणि षंढ या वर्गवारीत इतिहास त्यांची नोंद घेईल. श्रीकृष्ण हे केवळ एक नाव, दैवी-धार्मिक व्यक्तिरेखा, कथा-कवितांचा शृंगारी किंवा चमत्कारी नायक नाही. हा एक अखंड व भक्कम जीवन स्त्रोत आण...