कारगिल, हिमनगाचे एक टोक
कारगिल, हिमनगाचे एक टोक कारगिल युद्ध भारत व पाकिस्तान दरम्यान १९९९ च्या उन्हाळ्यात झालेले मर्यादित युद्ध होते. यात युद्धरुपी हिमनगाचे टोक काश्मिर मध्ये व्यक्त झाले होते. त्या वेळी दिसलेल्या त्या हिमनगाचा जलमग्न भाग चीनी युद्धज्वारपासून नेपाळी कागाळ्या आणि पाकिस्तानच्या सततच्या आगळीकीतून दिसून येतो . याचा विस्तार मोठा आहे. २६ जुलै. कारगील विजय दिवस. पाकिस्तानी षडयंत्राने रचलेला डाव भारतीय विरांनी उधळला, ती ही तारीख. ही बाब फक्त एवढीच नाही. त्या युद्धाच्या पोटात धुमसणारे अनेक घटक आहेत. १९९९ च्या कारगील युद्धाच्या आधी १९८५ साली जणू याची रंगीत तालीमच झाली होती. त्यावेळीही व नंतर झालेल्या युद्धाने देशाला चांगलेच झुंजवले होते. आता ड्रॅगनची समस्या सीमेवर नेहमीप्रमाणेच डोके वर काढून बसली आहे . एकूणच काय तर कारगील हे एक हिमनगाचे टोक होते . दहशतवाद, भारताचा विकास रोखण्यासाठी प्रयत्नशील तथाकथित सभ्य शक्तींचे अदृश्य हात, पाकिस्तानचा भारत द्वेष आणि चीनची दुष्ट बुद्धी, भारतात राहून विदेशी हातांना मजबूत करण्याचे मनसुबे असलेल...